मुंबई

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी गाजर, काकडी, बीट सारख्या फळभाज्या खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. गाजर खाण्याचे खूप फायदे आहेत. गाजरात मोठ्या प्रमाणात पोषक मूल्य असतात, ज्याची शरीराला अत्यंत गरज असते. गाजरात विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटिन असतं, त्यामुळे गाजर खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहते आणि पचनक्रिया (Eating black carrot cures many diseases) सुधारते. मात्र काळ्या रंगाचं गाजर तर लाल रंगाच्या गाजरापेक्षाही फायदेशीर असतं. काळ्या रंगाचं गाजर नियमितपणे खाण्याचे अनेक फायदे आहेत.

काळं गाजर खाल्ल्याने हे आजार होतात दूर
रक्तातील साखरेवर नियंत्रण आणण्यासाठी काळं गाजर उपयुक्त ठरतं. वजन कमी करण्यासाठीही काळं गाजर परिणामकारक आहेत. यात डाइयटरी फायबर आणि खास पॉलिफेनॉल असतं, ही पोषक द्रव्यं पचनक्रिया वाढवते आणि चरबी जमा करण्यापासून रोखतात. यामुळे मेटाबॉलिजनची प्रक्रिया वाढते.

हृदयासंबंधित आजार
हृदयाशी संबंधित धोकादायक आजारांचं सर्वांनाच टेन्शन असतं. यापासून बचाव करण्यासाठी काळं गाजर तुम्हाला मदत करेल. यात फायबर आणि बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे हृदयाशी संबंधित आजारावर उपाय म्हणून काम करतात. याशिवाय या गाजरामुळे तुमच्या शरीरातील निरुपयोगी कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत होते.

कर्करोग
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही या एका गोष्टीने दूर होऊ शकतो. काळ्या गाजरमध्ये फायटोकेमिकल्स देखील आढळतात जे कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतात. नियमित सेवनाने तुम्हाला कॅन्सरचा धोका कमी होईल.

(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित असून याचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here