@maharashtracity

टास्क फोर्स तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबई: मुंबईत कोरोनाची तिसरी लाट उतरणीला लागली असल्याचे चित्र असले तरीही व्हेंटीलेटरवरील पाचशे तसेच आयसीयूमधील दिड हजार रुग्ण स्थिर होईपर्यंत चिंता आहे. तिसऱ्या लाटेत बाधितांमधील सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला कोरोना टास्क फोर्स तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत सोमवारी ९६० एवढी दैनंदिन कोरोना रुग्ण (corona patients) नोंद करण्यात आली. दैनंदिन कोरोना नोंद सतत घटत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि सक्रिय रूग्ण अशी किंचित घट दिसून येत आहे. मात्र, रविवारी ११ मृत्यू नोंदविण्यात आले.

मृत्यू स्थिर आणि रुग्ण संख्या घटती असल्याने यावर बोलताना राज्य कोरोना टास्क फोर्सचे (Corona Task Force) सदस्य डॉ. अविनाश सुपे (Dr Avinash Supe) यांनी सांगितले की, आजाराच्या लाटा वेगाने येतात तशाच त्या वेगाने ओसरतात. दक्षिण अफ्रिकेत (South Africa) ओमिक्रॉनची लाट महिनाभरातच कमी झाली असल्याचे ते म्हणाले.

तिसरी लाट ओमिक्रोनची (Third wave of Omicron) मानली जात असताना भारतात तिसरी लाट २१ डिसेंबरला सुरु झाली. सध्या मुंबईतील संसर्ग कमी होत असल्याचे डॉ. सुपे म्हणाले. मुंबईत तिसऱ्या लाटेचा जोर सव्वा ते दिड महिण्यात कमी होण्याचा अंदाज टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, रुग्णसंख्या कमी होत असतानाच मृत्यू होत राहतील, असा अंदाज डॉ. सुपे यांनी व्यक्त केला. अद्याप पाचशे रुग्ण व्हेंटीलेटरवर (Ventilator) असून १५०० रुग्ण आयसीयूमध्ये (ICU) आहेत. आगामी दोन तीन आठवडे मृत्यू होत राहतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जोखमीच्या आजरातील तसेच ज्येष्ठ रुग्णांना काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. सुपे यांनी सांगितले.

पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेत तरुणांचे देखील मृत्यू झाले. मात्र, दोन्ही लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत तेवढे प्रमाण दिसून येत नाही. त्यामुळे जोखमीच्या आजारातील रुग्ण, सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here