@maharashtracity

७ लाख ६० हजारांचा माल जप्त

मुंबई: आक्षपार्ह जाहिरांतींमुळे आयुर्वेदिक कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) न्यायालयीन कारवाईची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी प्रकरणे एफडीएसमोर निदर्शनास आली आहेत.

मुंबई सेंट्रल येथील हर्बोलॅब प्रा. लि. या खासगी आयुर्वेदिक कंपनीच्या उत्पादकांवर आक्षेपार्ह जाहिरातींचा ठपका ठेवत एफडीएने तब्बल ७ लाख ६० हजारांचा माल जप्त केलाय.

पुरुषांमध्ये कामवासना वाढवणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित करणे, मुतखडा बरा करणे, उच्च रक्तदाब कमी करणे, मधुमेह बरा करणे अशा जाहिराती हर्बोलॅब प्रा.लि. कंपनीच्या उत्पादनांवर आढळून आल्या.

एफडीच्या रामेश्वर डोईफोडे आणि राजेश बनकर या औषध निरीक्षकांनी (Drugs Inspector) ४ ऑक्टोबरला हर्बोलॅब प्रा.लि. या कंपनीच्या मुंबई सेंट्रलच्या कार्यालयाला भेट दिली होती.

Also Read: पावसाला मुंबई सोडवेना

कंपनीच्या हर्बो टर्बो लॅब, पुनावा पिल, सायक्लॉहर्ब, डायबॅक्स ब्लिस, हर्बो काल्म, रॅनो हर्ब्स आदी उत्पादनांवर एफडीएच्या अधिकाऱ्यांना आक्षेपार्ह जाहिराती (objectionable advertisement) आढळल्या. या सगळ्या उत्पादनांचा माल एफडीएने जप्त केला आहे.

यावर बोलताना अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त (औषधे) जी. बी. काळे म्हणाले की, आजार बरा करतो, याबाबतच्या जाहिराती देताना अन्न व औषध प्रशासनाने काही नियम तयार केले आहेत.

काही आजारांचा उल्लेख उत्पादनांवर करता येत नाही, अन्यथा संबंधित कंपनीवर औषधे व जादूटोनादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४) कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयीन कारवाई केली जाते.

सुरुवातीला डॉ. वैद्याज या संकेतस्थळावर आयुर्वेदिक औषधांच्या आक्षेपार्ह जाहिराती एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्या होत्या.

त्या प्रकरणानंतर ४ ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल येथील हर्बोलॅब प्रा.लि. या आयुर्वेदिक कंपनीला एफडीएच्या अधिका-यांनी भेट दिली. आक्षेपार्ह उत्पादनं जप्त केल्यानंतर तपास पूर्ण होताच, न्यायालयीन कार्यवाही केली जाईल, असंही एफडीएनं स्पष्ट केलय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here