@maharashtracity

धुळे: बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (fake corona vaccination certificate) घोटाळ्याप्रकरणी धुळे शहर पोलिसात (Dhule Police) शुक्रवारी रात्री गुन्हा अज्ञाताविरुध्द दाखल झाला.

शहरातील तीन हजार 191 नागरिकांचे बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरीत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. धुळे महानगर पालिकेचे (Dhule Municipal Corporation – DMC) सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

सोनार दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी शहरातील एसव्हीकेएम महाविद्यालयात कोविशिल्डच्या 74 लस (covishield vaccine) देण्यात आल्या होत्या. मात्र तेथे 14 ऑक्टोबर रोजी दिलेल्या युजर आय.डी. व पासवर्ड या ओळखदर्शक चिन्हांची चोरी करून 2 हजार 80 जणांचे लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली.

असाच प्रकार 4 डिसेंबर 2021 व 6 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला असून प्रत्यक्षात महापालिकेने तेथे कुठलीही लस पुरविलेली नसताना कोविशिल्डची 1 हजार 111 लोकांनी लस घेतल्याची खोटी नोंद करण्यात आली. परिणामी, शहरातील 3 हजार 191 नागरिकांचे बनावट लसीकरण प्रमाणपत्र वितरीत झाले.

यातून महानगर पालिकेसह शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here