@maharashtracity

फक्त पालिका केंद्रांवरच डोस मिळणार

लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आवश्यक

मुंबई: ‘ओमायक्रॉन’ या नवीन प्रकारच्या विषाणू जगभरात थैमान घालत आहे. त्यामुळे आता त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) १० जानेवारीपासून फ्रंट लाईन, हेल्थ कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बुस्टर डोस (booster dose) देण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी लसीकरण केंद्रांवर (Private vaccination Centre) बूस्टर डोसबाबत सरकारने ठरवून दिलेली रक्कम मोजावी लागणार आहे. मात्र त्यासाठी संबंधितांना त्यांनी लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

मुंबईत कोविडची पहिली लाट (first wave covid) आल्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव खुपच वाढला होता. त्यावेळी जगभरात कोविड -१९ ला रोखण्यासाठी बाजारात कोणतेही औषध उपलब्ध नव्हते. मात्र केंद्र सरकारच्या आदेशाने कोविडला रोखण्यासाठी व त्यापासून बचाव होण्यासाठी मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेअंतर्गत लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

मुंबईत आतापर्यंत एक कोटी लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ९० टक्के लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसात झपाट्याने पसरलेल्या ‘ओमायक्राॅन’ (Omicron) या नवीन प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरला.

मुंबईत तर कोविड, ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कालपर्यंत एका दिवसांत २० हजारांवर गेली आहे. याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने हेल्थकेअर (Healthcare) व फ्रंट लाईन कर्मचारी (Front line workers) आणि जेष्ठ नागरिक (Senior Citizen) यांना ‘बूस्टर डोस’ देण्याचा निर्णय घेतला असून येत्या १० जानेवारीपासून मुंबईत पालिका रुग्णालयात (BMC Hospital) व खासगी रुग्णालयातही ‘बूस्टर डोस’ देण्यास सुरुवात होणार आहे.

१० एप्रिल २०२१ किंवा १० एप्रिल २०२१ नंतर दुसरा डोस घेतलेले हेल्थकेअर कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी आणि जेष्ठ नागरिक बुस्टर डोससाठी पात्र ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here