@maharashtracity

हर घर दस्तक मोहिमेत रविवारी ३ लाखाहून अधिक लसीकरण

मुंबई: राज्यात रविवारी ३ लाखाहून अधिक लसीकरण झाल्याची नोंद झाली. सण-उत्सव संपल्यानंतर नागरिकांकडून रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी झालेल्या लसीकरणामुळे राज्यात पहिल्या डोसची टक्केवारी ८० टक्क्यांवर पोहोचली आहे.

सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या हर घर दस्तक या उपकमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी देखील सुटी न घेता लसीकरण (vaccination) सुरु असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हर घर दस्तक (Har Ghar Dustak) ही मोहिम दिनांक ३ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के पहिला डोस देण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे.

राज्यातील सुमारे १.८२ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही पहिल्या डोसच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत हा आकडा पार करु असा विश्वास राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी व्यक्त केला.

Also Read: मुंबईत दाखल १ हजार पर्यटकांचा युद्धपातळीवर शोध

मात्र हर घर दस्तक या मोहिमेअंतर्गत पहिल्यांदाच रविवारी एवढा मोठा लसीकरणाचा आकडा पार केला असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगत अजून बरीच लोकसंख्या बाकी असल्याचे कबुल केले.

नव्या व्हेरियंट धाकातून लोक लसीकरणाकडे वळत आहेत असे नसून जागरुक नागरिकांमध्ये लसीचे महत्व पटले आहे. शिवाय, रविवारी लोक सुटीमुळे घरी असल्याने सर्वांपर्यंत लस पोहचणे सोपे जाते.

कोविन पोर्टलनुसार (Cowin Portal), रात्री १० पर्यंत २.९१ लाख नागरिकांच्या झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिसत होती. पण, या आधीच्या ७ रविवारची आकडेवारी पाहिल्यास लसीकरणाचा वेग सरासरी ४३ हजार ते १.७६ लाखांपर्यंत होता.

त्याआधी १० ऑक्टोबर रविवार या दिवशी चांगले लसीकरण राज्याने नोंदवले होते. त्यावेळेस ४.२९ लाख नागरिकांचे लसीकरण झाले होते. याआधी शुक्रवारी आणि शनिवारी लसीकरण केंद्रांवर गर्दी होते. पण, मुंबईसह (Mumbai) राज्यातील जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी लसीकरण बंद ठेवले जाते.

दरम्यान, औरंगाबादमध्ये (Aurangabad) ४० हजार नागरिकांचे लसीकरण तर लसीकरणात शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बीड जिल्ह्यांतही ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here