@maharashtracity

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्राला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे लेखी उत्तर

धोरण ठरविण्यासाठी १ सप्टेंबर २०२१ रोजी मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई: मुंबईतील पश्‍चिम उपनगरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी खाजगी वित्तयी संस्था तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या (Public Private Partnership) माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Govt Medical College) व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी शासनाची भूमिका असल्याची माहीती वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर (Shiv Sena MLA Ravindra Waikar) यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे.

मागील काही वर्षात मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील लोकसंख्येत वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कुपर महाविद्यालय (Cooper Hospital) सोडल्यास पश्‍चिम उपनगरामध्ये एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने पश्‍चिम उपनगरामध्ये एक सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, असे पत्र आमदार वायकर यांनी मंत्री देशमुख यांना पाठविले होते.

या पत्राच्या अनुषंगाने सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात एकुण ५७ वैद्यकीय महाविद्यालय असून महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश क्षमता ९००० एवढी आहे. यात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी क्षमता ३३५० एवढी आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तसेच विद्यार्थ्यांची वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी वित्तीय संस्थेच्या पुढाकारातून (Private Finance Initiave) तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) च्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (Hospital) स्थापन करण्यासाठी धोरण ठरविणेबाबत मंत्रीमंडळाने १ सप्टेंबर २०२१ रोजी मान्यता दिली आहे.

मंत्रीमंडळाने (cabinet meeting) मान्यता दिलेल्या धोरणाप्रमाणे पीएफपी व पीपीपी यापैकी योग्य ठरणार्‍या मॉडेलच्या माध्यमातून नवीन वैद्यकीय स्थापन करण्याची शासनाची भूमिका असल्याचे लेखी पत्र अमित देशमुख यांनी आमदार वायकर यांना पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here