मुंबई

सुकामेवा आरोग्यासाठी किती फायद्याचं असतो, हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र हा सुका मेवा भिजवून खाल्ले, तर फायदा दुप्पट होतो. अशा प्रकारेच बदाम भिजवून खाणे अत्यंत लाभदायक आहे.

हृदयाचं आरोग्य
बदामात अँन्टीऑक्सिडंटसह मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतं, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉल कमी कमी करण्यासाठी मदत करतात. भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे हृदयसंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

पचनक्रिया
भिजवलेल्या बदामात फायबर आणि विटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असतं. बद्धकोष्ठतेसह पोटोसंबंधित आजारांशी लढण्यासाठी भिजवलेले बदामांचं सेवन करावं.

साखरेची पातळी
भिजवलेल्या बदामात मॅग्नेशियन असतं, ज्याचं सेवन शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवतं. मधुमेहींनी दररोज ६ ते ८ बदामांचं सेवन करावं.

केस आणि त्वचेसाठी
बदामात विटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे त्वचा चमकदार होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडताहीत. बदाम खाल्ल्याने केस काळे, जाड आणि मजबूत राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here