Twitter :

मुंबई :

राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमधील २८ लाख आदिवासींच्या आरोग्यासाठी केईएम रुग्णालय (KEM Hospital) आणि पीरामल फाऊंडेशनच्या (Piramal Foundation) भागीदारीतून आरोग्य सेवा देण्याचे ठरले आहे. यात आजारावरील उपचारांमुळे ६८ टक्के हून अधिक आदिवासींना या उपकमाचा फायदा होणार आहे. यात आरोग्य सुचकांमध्ये ६ ते ८ टक्क्यांमध्येवाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.  

या दोन्ही संस्थांच्या समझोत्यामुळे आजारांवरील उपचारांच्या व्यवस्थापनाच्या रोगनिवारक आणि प्रतिबंधात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित केले जाणार असून राज्यातील ५ प्रमुख महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमधील २८ लाख आदिवासींपर्यंत पोहोचण्यात येणार आहे. याची पालघर जिल्ह्यापासून सुरुवात केली जाणार असून नंदुरबार (Nandurbar), गडचिरोली (Gadchiroli), वाशिम (Washim), उस्मानाबाद (Osmanabad) व पालघर (Palghar) या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. आरोग्य सूचकांकामध्ये दरवर्षी ६ ते ८ टक्क्यांची वाढ करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आदिवासी समुदायामधील कुपोषण, माता व बालक आरोग्य, अॅनिमिया आणि टीबी यासारख्या समस्यांचे निवारण करण्यात येईल.

आदिवासी समुदायांमध्ये आदिवासी उपचार (treatment of tribal) करणाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या ६८ टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्येला फायदा होणार आहे. येथील प्रतिसाद आणि निकष पाहून इतर जिल्ह्यांमध्ये देखील त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्य सूचकांकामध्ये दरवर्षी ६ ते ८ टक्क्यांची वाढ करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आदिवासी समुदायामधील कुपोषण, माता व बालक आरोग्य, अॅनिमिया आणि टीबी यासारख्या समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे.

यावर बेलताना पीरामल ग्रुपच्या उपाध्यक्ष, डॉ. स्वाती पीरामल यांनी सांगितले की, सरकारी यंत्रणा मजबूत करुन केईएम सोबत ही भागीदारी, राज्यभरातील आदिवासी समुदायांना आरोग्य देण्यासाठी हे प्रयत्न आहेत. आरोग्यसेवांमध्ये प्रगती घडवून आणून, सकारात्मक बदल घडवायचे असल्याचे सांगितले तर केईएम रुग्णालय अधीष्ठाता डॉ संगीता रावत यांनी आरोगय सेवांपासून वंचित असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सुधारित परिणाम घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here