@maharashtracity

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आरोग्य विभागाला सूचना

मुंबई: राज्यातली शाळा सुरु होत असताना स्वयं शिस्त महत्वाची असून शाळेतील व्यापकता पाहिल्यास प्रत्येकाला स्वनियंत्रणातूनच स्वतःचा बचाव होऊ शकतो. राज्यात लाखो शाळा असून शाळांमधून नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वयं शिस्तीने पाल्याला शाळेत पाठवावे. बाकी शासन आणि निम शासनाकडून नियंत्रण ठेवले जाईलच अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमातील (आरबीएसके) डॉक्टर घेणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. (Rajesh Tope assures RBSK will take care of student’s health)

सोमवार पासून राज्यातील शाळा सुरु झाल्या असून दीड ते दोन वर्षानंतर विद्यार्थी शाळेत प्रवेश करत आहेत. महामारीच्या अनुषंगाने राज्य आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य हेतूने तयारी ठेवण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महामारीच्या काळात शाळेत गंभीर प्रसंगी गरज लागल्यास केलेल्या नियोजनाबाबत बोलताना टोपे बोलत होते. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमातील डॉक्टरांचे पथक प्रत्येक शाळेत सतत जात असते.

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत प्रत्येक डॉक्टरने प्रत्येक शाळेला भेट दिली पाहिजे, अशी अपेक्षा असून या भेटीदरम्यान बालकांची तपासणी होणेहि आवश्यक आहे. या तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांला त्रास आढळून आल्यास आरबीएसकेच्या डॉक्टरांनी याची त्वरित दखल घेणे आवश्यक आहे.

Also Read: कोरोना नियमांचे पालन करीत शाळा भरली

तशा सूचना देऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आरोग्य विभागाच्या आरबीएसकेच्या पथकाला सुचविण्यात आले असल्याचे टोपे म्हणाले .

या पथकात एमबीबीएस, बीएमएस डॉक्टर असतात. सर्व आवश्यक साधनसामुग्री या पथकाकडे उपलब्ध असते. शाळांतून भेट देण्याचे काम हे पथक वर्षानुवर्षे करत असते. अशा वेळी कोणत्या दुर्मिळ आजाराचे निदान झाल्यास त्यावर सरकार मोफत उपचार करत असते.

हे पथक अनुभवी असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या जबाबदारीसह आता कोविडची जबाबदारी देखील या पथकाला देण्यात आली असल्याचे टोपे यांनी आज स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here