@maharashtracity

धुळे: धुळे शहरात आज सलग दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळेस मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. (heavy rain in Dhule) पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले. तर नागरिकांचीही धावपळ उडाली. देवपुर परिसरासह शहरातील विविध भागात खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे.

धुळे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाऊस होत आहे. बुधवारी दोन टप्यात तीन तासांपेक्षा अधिक पाऊस झाला. तसेच रात्री बराच वेळ पावसाची रिप रिप सुरु होती. मध्यरात्री नंतर पावसाने विश्रांती घेतली. तसेच आज गुरुवारी दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांचीही धावपळ उडाली.

पावसामुळे रस्त्यावरील खड्डे व खोलगट भागात पाणी साचल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वसाहतीत याचा सर्वाधिक त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. पाण्याचा निचरा लवकर होत नाही. त्याच कच्चे रस्ते असल्याने त्यावरुन जाणेही त्रासदायक ठरत आहेत.

शहरात पाऊस झाल्यानंतर देवपुर परिसरात सर्वाधिक नागरीकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री खड्डयांचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या खड्यात वाहने आदळून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. देवपुरासह शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्डयाने नागरीक हैराण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here