@maharashtracity

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णालयातील बेड कमी पडू लागले असताना महापालिकेने विगलीकरणासाठी (quarantine) काही हाॅटेल्स ताब्यात घेऊन त्यांचा वापर केला होता. कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या या हॉटेलची खूप चांगली मदत झाली. त्यामुळे या बाबीकडे सकारात्मक दृष्टीने बघता मुंबई महापालिकेने या हॉटेल चालकांना मालमत्ता करात सलग दुसऱ्यांदा सूट (BMC decide to waive off property tax to hotels) देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे हॉटेल चालकांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट पालिकेच्या नियंत्रणात आलेली आहे. मात्र जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून तिसरी लाट (third wave of the corona) आली तर अशा प्रसंगी मुंबईतील काही हॉटेल्सचा यापुढेही विलगीकरणासाठी वापर करता येणार आहे.

यंदा, हॉटेल मालकांना मालमत्ता करात ४१ कोटी ८७ लाख रुपयांची सुट देण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

महापालिकेने कोरोना कालावधीत विलगीकरणासाठी वापरण्यात आलेल्या १८० हॉटेल चालकांचा २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ केला होता. आता २३४ मालमत्तांना चार महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ४१ कोटी ८७ लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here