मुंबई

भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडी सुरू होताच गिझरचं महत्त्व कळायलं लागतं. या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करणं कठीण जातं. जर तुम्ही तुमच्याकडील जुना गिझर काढून नवा घेण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. काही जणं आवश्यकतेपेक्षा मोठा गिझर खरेदी करतात तर काहीजणं माहिती नसल्याने लहान गिझर विकत घेतात. दोन्ही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. चार जणांचं कुटुंब असेल तर तुम्हाला किती क्षमतेच्या गिझरची आवश्यकता असते?

एकटे राहणाऱ्यांसाठी इमर्शन रॉड पुरेसं असतं. मात्र कुटुंबात चार जणं असतील तर गिझरची गरज भासते. जाणून घ्या तुम्हाला किती क्षमतेच्या गिझरची आवश्यकता आहे.

वॉटर हिटरची निर्मिती करणारी कंपनी Racold ने दिलेल्या माहितीनुसारे, ३ ते ४ जणांसाठीच्या घरात २५ ते ३० लिटर क्षमतेचा इलेक्ट्रिक गिझर बेस्ट आहे. या जास्त क्षमतेच्या गिझरमध्ये एकाच वेळी जास्त पाणी गरम केलं जाऊ शकतं. ज्यात सर्वांना गरम पाणी मिळू शकतं.

जर घरात तुम्ही दोघंजणं राहत असाल तर तुमच्यासाठी १० ते १५ लिटर क्षमतेचा गिझर पुरेसा आहे.

गिझर खरेदी करताना क्षमतेसह दुसऱ्या गोष्टींकडेही द्या लक्ष
तुमचं लोकेशन – जर तुम्ही डोंगराळ भागात राहता तर तुम्ही टँकलेस वॉटर हिटर खरेदी नका करू, कारण डोंगराळ भागात पाण्याचं तापमान कमी असतं, तिथे टँकलेस वॉटर हिटर पाणी पुरेसं गरम करीत नाही.

तुमच्या घरचं विजेचं बिल
तुमच्या घरातील वीज पुरवठा कमकुवत असेल, तर कमी क्षमतेचे गिझर खरेदी करावे. जास्त क्षमतेचे गिझरना जास्त विजेची गरज असते, ज्यामुळे वीज बिलात वाढ होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here