@maharashtracity

व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची डॉक्टरांची माहिती

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती स्थिर असून व्हेंटिलेटर (Ventilator) काढण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लतादीदी यांची प्रकृती स्थिर असून किंचित सुधारणा होत आहे. मात्र आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

काही दिवसांपासून लता मंगेशकर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत.

दरम्यान, लताजींच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची निराधार माहिती व्हायरल झाल्याने मंगेशकर कुटुंबीयांकडून अशी चुकीची माहिती पसरवू न देण्याचे सतत आवाहन करण्यात येत आहे.

लतादीदींनी ट्विटरवरून चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर यांची जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (corona test) आली होती. त्यांना कोरोना निमोनियाची लक्षणे आढळून आली होती. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉ. प्रतीत समदानी यांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

सध्या मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सतत प्रकृतीबाबत माहिती देणे शक्य होत नाही. तरी त्रासदायक अफवा पसरवू नका, असे आवाहन लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here