नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमने इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. हैद्राबाजमध्ये पहिल्याच सामन्यात अपयश मिळाल्यानंतर पुढील तीन सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने या सीरिजमध्ये ३-१ असा विजय राखला आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने १९१ धावांचं लक्ष्य पूर्ण करीत ५ विकेट्स गमावून विजय मिळवला आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यावर निर्णय आला असून कसोटी मालिका टीम इंडियाचा विजय झाला आहे. रांचीमधील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून बॅटिंग निवडली होती. जो रूटचं शतक आणि ओली रॉबिन्सनच्या ५० धावांमुळे टीमने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या.
मात्र भारतीय टीमला पहिल्या सामन्यात केवळ १७७ धावा करता आल्या आणि ७ विकेट्स गमवावे लागले. यावेळी इंग्लंडची टीम मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात होती. परंतू ध्रुव जुरेलने एका टोकाला राहून संपूर्ण खेळ पालटला. 149 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावांची अप्रतिम खेळी करत टीमला 307 धावांपर्यंत नेले. यसस्वी जैस्वालनेही या डावात ७३ धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध 46 धावांची आघाडी घेतली.