मुंबई
प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. पंकज उदास यांची मुलगी नायाब उदास यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी दिली. पंकज उदास बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यातच आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी ११ वाजता पंकज उदास यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. त्यांच्या एग्झिटमुळे संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. चाहते सोशल मीडियावरुन पंकज उदास यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.