@maharashtracity

कमी वेळेत शरीरयष्टी करणाऱ्या प्रशिक्षण केंद्रांवर कारवाई होणार

केंद्रांवर होत आहे प्रोटीन स्टिरॉइडची अवैध विक्री

मुंबई: राज्यासह मुंबईतील काही मोक्याच्या जिममध्ये (Gym) कमी वेळात शरीरयष्टी करून देणाऱ्या सप्लिमेंट पावडरची विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रोटीन पावडर तसेच स्टिरॉइड (steroids) तरुणांना विकले जात आहे. हे तरुणांच्या आरोग्याला घातकी असून जीवाला धोका निर्माण होतो.

या विरोधात ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनकडून अन्न व औषध प्रशासनाला तक्रार लिहिण्यात आले आहे. अशा व्यायाम शाळांना पदार्थ विक्री करण्याची कोणतीही परवानगी नसल्याची छाननी एफडीएने करावी. यावर जिममध्ये अशी अवैध औषध विक्री होत असल्यास अन्न व औषध प्रशासनान त्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड अशा पश्चिम उपनगरातील व्यायामशाळांमध्ये स्टिरॉइड, प्रोटीन पावडर (Protein powder) मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याने या ठिकाणाहून तपासणीला सुरुवात व्हावी, अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनच्या अभय पांडे यांनी केली आहे.

प्रोटीन पावडर अन्न कायदे अंतर्गत पदार्थ असून स्टिरॉइड औषध अंतर्गत मोडत आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री एफडीएच्या नियमानेच होणे आवश्यक असल्याचे पांडे यांनी सांगितले. टीव्ही सिरीयल किंवा चित्रपटात काम करणाच्या मोहाने बरेच तरुण तरुणी जिममधील अशा आमिषांना बळी जात आहेत.

अशा विक्रीला डॉक्टरांचा सल्ला नसल्याने अवैध विक्री मानली जात आहे. तसेच व्यायामशाळांना अशा कोणत्याही विक्रीची परवानगी नसल्याने औषधं आणि अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आले.

यावर बोलताना एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मुंबईतील जिम मध्ये असे प्रकार होत असल्यास लवकरच जिमची झाडाझडती घेण्यात येईल. या तपासण्यातून काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here