@maharashtracity

कोविडच्या रडारवर बॉलीवुड

मुंबई: कोविडच्या (covid) संसर्गाची अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबियांना अलिकडेच लागण झाली होती. त्यामुळे बॉलिवूडमध्ये (Bollywood) काहीशी भिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूड कोविडच्या रडारवर आले आहे. अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) व अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघी कोविड बाधित असल्याचे समोर आले आहे.

अभिनेत्री करीना कपूर व अमृता अरोरा कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींच्या संपर्कात आलेल्या अंदाजे ३० जणांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) करण्यात आली आहे. त्याचा वैद्यकीय अहवाल पुढील २४ तासांत येणार आहे. मात्र ज्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटीव्ह येईल त्यांची पुन्हा ७ दिवसानंतर चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे, कोविड बाधित अभिनेत्री करिना कपूर व अमृता अरोरा या दोघींनाही रुग्णालयात दाखल न करता त्यांच्या घरीच ‘क्वारंटाईन’ (Home quarantine) करण्यात आले आहे. मात्र त्या दोघींची घरे बाहेरून सील करण्यात आली असून त्या घरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यास मनाई करण्यात आले आहे, अशी माहितीही काकाणी यांनी दिली.

मुंबईत कोविड -१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला पालिका आरोग्य यंत्रणेने परतावून लावले अडून तिसऱ्या लाटेलाही थोपवले आहे. मात्र कोविडचा नवीन विषाणू प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’च्या (Omicron) वाढत्या धोक्याची जगभरात चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपियन देशात तर या नवीन विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत (Mumbai) या नवीन विषाणूचे ५ रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने त्यापैकी ३ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप २ रुग्ण उपचार घेत आहेत.

अभिनेत्री करीना कपूर व अमृता अरोरा या गेल्या काही दिवसांपासून एकत्रितपणे पार्टीला जात असत, फिरत होत्या. या दोघीनी कोविड चाचणी केली असता त्यात त्या कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here