@maharashtracity

संपर्कातील ११० जण निगेटिव्ह

मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिला तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरीण (maid) व सीमा खानची (Seema Khan) बहीण यांच्यामुळे कोविडची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती कोविड चाचणी अहवालातून समोर आली आहे.

करिना कपूर हिची मैत्रीण अमृता अरोरा (Amrita Arora) हिलाही कोविडची (Covid) लागण झाली आहे. मात्र या दोघींच्या संपर्कात आलेले ११० जण कोविड चाचणीत ‘निगेटीव्ह’ आले आहेत. ही करिना कपूर, चित्रपट सृष्टी (Bollywood) आणि पालिकेसह मुंबईकरांसाठी (BMC) समाधानाची बाब आहे.

अभिनेत्री करीना कपूर आणि तिची जिवलग मैत्रीण अमृता अरोरा या दोघींना कोविडची बाधा झाल्याने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यात करण जोहरलाही (Karan Johar) कोविड बाधा झाल्याने चर्चेला उधाण आले होते.

या दोन्ही अभिनेत्रींना कोविडची लागण कशी व कुठे आणि कोणाच्या माध्यमातून, संपर्कातून झाली याचा पालिका आरोग्य यंत्रणेने घेतला असता करिनाला तिच्या घरातील मोलकरणीमुळेच कोविडची बाधा झाल्याचे आरोग्य यंत्रणेला आढळून आले.
त्यामुळे त्या दोघींना ‘होम क्वारंटाईन’ (Home quarantine) केले आहे.

करिना कपूर व तिची मैत्रीण अमृता अरोरा यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी, सुरक्षारक्षक (Security guards) इमारतीतील रहिवासी आदी ११० लोकांचे कोविड चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

इमारतीऐवजी घरे सील होणार

करिना कपूर व अमृता अरोरा आणि अभिनेता सोहेल खानची (Sohail Khan) पत्नी सीमा खान हे कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने सुरक्षिततेचं कारणास्तव त्यांच्या राहत्या इमारती आणि त्या करण जोहर याच्या पार्टीत सहभागी झाल्या असल्या कारणाने जोहर याची इमारत अशा ४ इमारती सील केल्या होत्या. आता त्यांच्या संपर्कातील व्यक्ती निगेटीव्ह असल्याचे आढळून आल्याने या इमारतींचे सील काढले जाणार आहे.

वास्तविक, एखाद्या इमारतीत २ पेक्षा कमी रुग्ण आढळल्यास संबंधित रुग्णाचे घर सील केले जाते. त्यानुसार आता या अभिनेत्रींचे घर सील राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here