@maharashtracity

मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाड (रायगड): महाड (Mahad) तालुक्यातील कोल गावाजवळ असलेल्या समर्थ स्टोन क्रशर या दगड खाणीमध्ये शुक्रवारी सायंकाळी डंपर आणि क्रशर (crusher) यामध्ये सापडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत महाड शहर पोलीस (Mahad Police) ठाण्यामध्ये डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाड तालुक्यातील कोल गाव हद्दीत असलेल्या श्रीराम स्टोन क्रशरमध्ये अनिल गंगाराम पवार हा कामगार (labour) काम करत होता. त्यावेळी डंपर चालकाने अचानक डंपर मागे घेतल्याने खडी आणि क्रशरमध्ये दबून अनिल पवार गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. हा क्रशर सुरेश मोरे यांच्या मालकीचा असून डंपर क्रमांक एम. एच.०६ बी डी -०५३५ वरील चालक आरिफ करीम अन्सारी इक्बाल याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत कामगार अनिल गंगाराम पवार – ४९, राहणार दासगाव येथील आहे. डंपर चालक याच्यावर ३०४अ, ३३७, ३३८ , मोटर वाहन कायदा १३४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here