@maharashtracity

निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेची घोषणा

मुंबई: नीट तसेच पीजी २०२१ एमडी-एमएस (MD -MS) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून निवासी डॉक्टरांना (Resident doctors) रुग्णालयाच्या कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

देशातील निवासी डॉक्टराच्या फोर्डा आणि फेमा (FEMA) या संघटनांनी यापूर्वीच संपाची हाक दिली होती. मात्र महाराष्ट्रातील मध्यवर्ती मार्डच्या (MARD) निवासी डॉक्टरांनी रुग्णांची अडचण ओळखून २८ नोव्हेंबर रोजी केवळ निदर्शने केली. मात्र या निदर्शनातून सरकारने प्रवेश प्रक्रियांबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने देशातील निवासी डॉक्टरानी पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय मध्यवर्ती मार्ड संघटनेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून मार्डचे निवासी डॉक्टर ओपीडी सेवा (OPD service) बंद ठेवणार आहेत.

एमडीसाठी आवश्यक नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रीयेपूर्वी काऊन्सिलिंग करण्यात येते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या डॉक्टरांना निवासी डॉक्टर म्हणून काम करता येते. यासाठी सेंट्रल मार्ड संघटनेने केंद्र सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला पत्र लिहून विनंती केली आहे.

लवकरात लवकर काऊन्सिलिंग आयोजित करावे. जेणे करून राज्यभरातील रुग्णालयांत आणखी दोन हजार निवासी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सेंट्रल मार्ड संघटनेने मेमोरेंडम काढले असून त्यांनी सरकारला तोडगा काढण्यासाठी वारंवार विनंती केली. त्यानंतरही भरती प्रक्रिया (Recruitment process) सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना (corona) काळात नीट परीक्षेला उशिर झाला. जानेवारी २०२१ मध्ये होणारी परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. यातून पुढे काऊन्सिलिंगला देखील उशीर झाला. शिवाय आरक्षणासंबंधी (Reservation) काही प्रकरणे न्यायालयात गेल्याने समुपदेशन प्रक्रिया पुढे ढकलली होती.

सध्या ही प्रकिया लवकर घेणे अपेक्षीत होते. तरीदेखील सरकारकडून प्रकिया पुढे ढकलली जात आहे. मागील वर्षातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने सध्याच्या निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढत आहे.

नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भरतीप्रक्रीयेपूर्वी काऊन्सिलिंग न झाल्याने त्यांना निवासी डॉक्टर म्हणून काम करता येत नाही. त्यामुळे काउंसिलिंग आणि भरती प्रक्रिया लवकर झाल्यास निवासी डॉक्टरांची संख्या वाढून सध्याच्या निवासी डॉक्टरांवरील ताण कमी होईल.

मात्र हे समजून न घेता सरकारने भरती प्रक्रिया ६ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलल्याने मार्डचे डॉक्टर नाराजी व्यक्त करत सोमवारपासून ओपिडी बंद करण्याचे जाहिर केले आहे.

दरम्यान राज्यातील डॉक्टर सोमवार पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सध्या केवळ ओपिडी सेवा बंद करण्यात येणार असून सरकारने भरती प्रक्रीयेबाबत निर्णय न घेतल्यास पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचे डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here