@maharashtracity

यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांचा राजीनामा

मध्यवर्ती मार्डकडून नोंदवला निषेध

मुंबई: यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉ. अशोककुमार सुरेंद्र पाल यांची बुधवारी हत्या करण्यात आली. ही हत्या महाविद्यालय परिसरातच झाली. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी आयुक्तांना राजीनामा सुपुर्द केला आहे. (Dean resigned after murder of doctor in Yeotmal)

या घटनेतील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी निवासी डॉक्टरांच्या मध्यवती मार्ड (MARD) संघटनेकडून करण्यात आली आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. अशोक पाल हे २०१७ बॅचचे विद्यार्थी असून एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला होते. बुधवारी १० नाव्हेंबर रोजी रात्री ८ ते ८.३०च्या दरम्यान त्यांचा मृतदेह महाविद्यालय परिसरात आढळून आला.

याचा निषेध म्हणून यवतमाळ महाविद्यालयातील (Yeotmal government medical college) सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. या संपाची तीव्रता वाढल्याने महाविद्यालयाचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले होते.

या विद्यार्थ्यांनी यवतमाळ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याप्रमाणे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. बी. कांबळे यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तालयाकडे राजीनामा दिला आहे.

दरम्यान, मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून आणि निवासी डॉक्टरांकडून डॉ. अशोक पाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here