@maharashtracity

वैद्यकीय अभ्यासातून निष्कर्ष

मुंबई: सततच्या डोकेदुखीचा परिणाम व्यक्तिच्या दैनंदिन दिनचर्येवर होत असून सध्याचा तणाव, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित समस्या बनली आहे. यापैकी मायग्रेन (migraine patients) रुग्णसंख्येच्या अंदाजे १८ टक्के रुग्णांना वेगवेगळ्या वेदना सहन कराव्या लागतात.

यात प्रकाश आणि आवाजाची संवेदनशीलता तर कधीकधी मळमळ आणि उलट्या देखील होतात. काहींना दृष्टीसंबंधीत समस्येसह कानात वाजणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास जाणवतो.

कामावर अनुपस्थित राहण्याच्या कारणांपैकी सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कारणांपैकी मायग्रेन हे सहावे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अभ्यासातून काढण्यात आला आहे. (Migraine is one of the major reason of leave)

मायग्रेन हा प्राथमिक डोकेदुखीचा एक प्रकार आहे. यामुळे डोके आणि मानेच्या भागातील नसा, रक्तवाहिन्या आणि स्नायूवर ताण येतो. मायग्रेनचे नेमके कारण स्पष्टपणे माहीत नसून हे पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनामुळे देखील उद्भवू शकते असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

शिवाय मायग्रेनचा सामान्यतः ५० वर्षांखालील लोकांवर परिणाम होतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रभावित होत असून त्याचे प्रमाण ६८ ते ७० टक्के आहे.

यात डोकेदुखीची स्थिती समजून घेणे आवश्यक असून केवळ लक्षणांवर उपचार करणे उचित ठरत नसल्याचे रीजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक डॉ. प्रदीप महाजन (Dr Pradeep Mahajan) यांनी सांगितले. सेल आधारित थेरपी ही अशी एक पद्धत आहे जी शरीराच्या जन्मजात उपचार क्षमतेचा वापर करते यातून दीर्घकालीन सुरक्षित आणि प्रभावी परिणाम मिळत असल्याचे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले.

मायग्रेनमध्ये काही पेशींच्या कार्यपद्धतीत काही अडथळे येतात, ज्यामुळे डोक्यातील नसांभोवती सूज येऊन रक्तप्रवाहावर परिणाम होतो. स्टेम सेल्स आणि वाढीचे घटक मायग्रेनची लक्षणे दूर करू शकतात. शिवाय यामुळे योग्य रक्त संचरण आणि दाह कमी करण्यासाठी मदत मिळत असल्याचे डॉ. महाजन म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here