@maharashtracity

राज्यात ४६,७२३ रुग्ण नोंद

मुंबई: राज्यात बुधवारी रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे समोर आले. दिवसभरात ४६,७२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने २४ तासाच्या कालावधीत तब्बल १२ हजार ३॰२ रुग्णवाढ झाली असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ चिंतनीय बाब असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांनी मास्क, लसीकरणावर अधिक भर द्यावा असे सुचित करण्यात येत आहे.

बुधवारच्या नव्या संख्येने आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७०,३४,६६१ झाली आहे. तर २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६६,४९,१११ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२ टक्के एवढे झाले आहे.

तसेच राज्यात आज रोजी एकूण २,४०,१२२ सक्रिय रुग्ण असून आज ३२ करोना बाधित मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के एवढा आहे आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,११,४२,५६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७०,३४,६६१ (९.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १५,२९,४५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ६९५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

८६ ओमिक्राॅन रुग्ण

राज्यात बुधवारी ८६ ओमिक्राॅन संसर्ग असणारे रुग्ण (omicron patients) रिपोर्ट झाले आहेत. यापैकी २५ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, ३० राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) आणि ३१ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय (BJ Medical college) यांनी रिपोर्ट केले आहेत. या ८६ रुग्णांत पुणे मनपा ५३, मुंबई २१, पिंपरी चिंचवड ६, सातारा ३, नाशिक २, पुणे ग्रामीण १, असे आहेत. आता राज्यात एकूण १३६७ ओमिक्राॅन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here