तसेच मुलुंड विधानसभा क्षेत्रात सॅनिटायझेशन ड्राईव्ह……

संपूर्ण मुंबईत गरीब व सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. लसीकरण करण्यासाठी कोविन अँप किंवा पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे त्याशिवाय नागरिकांचे लसीकरण होत नाही आहे. तसेच लसींचा ही तुटवडा निर्माण झालेला आहे, लस कुठे उपलब्ध आहे कुठे नाही याची माहिती देखील लोकांना मिळत नाही आहे. यासर्व समस्या सोडविण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे मुलुंड विधानसभा क्षेत्रांत 6 ठिकाणी लसीकरणासाठी हेल्पलाईन सेंटर सुरू करण्यात आले आहेत. याचे उदघाटन मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते आज मंगळवार, 11 मे 2021 रोजी करण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा सुद्धा उपस्थित होते. या हेल्पलाईन सेन्टरमुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण संदर्भातील सर्व समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत होणार आहे.

आज मुंबई काँग्रेसतर्फे संपूर्ण मुलुंड विधानसभा क्षेत्रात सॅनिटायझेशन ड्राईव्ह सुद्धा सुरू करण्यात आले आहे. कोरोना महामारीत सॅनिटायझेशन खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे या विभागात सर्व इमारतीत, सोसायटीमध्ये, चाळीत आणि झोपडपट्टीमध्ये सॅनिटायझेशन करण्यासाठी सॅनिटायझेशन ड्राईव्ह सुरू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here