@maharashtracity

भाजपच्या मागणीला प्रतिसाद
भाजपचे भालचंद्र शिरसाठ यांचा दावा

मुंबई: मुंबईत कोरोना नियमांचे पालन करून छटपूजा करण्यास पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी परवानगी दिली आहे. (Chhat Pooja permitted by BMC) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही दिवाळीनंतर येणाऱ्या छटपूजेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपतर्फे (BJP) स्थायी समिती सदस्य व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी पालिका आयुक्त चहल यांच्याकडे केली होती. याबाबतची माहिती शिरसाट यांनी दिली होती.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव आहे. त्यामुळे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने (BMC) काही निर्बंध लागू केले होते. विविध उपाययोजना करून कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे.

मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतातील लोक वास्तव्य करतात. त्यामुळे गेले कित्येक वर्षे मुंबई शहरातसुद्धा छठपुजेचे आयोजन चौपाटी परिसरात व अन्यत्र केले जाते.

Also Read: दादरा-नगर-हवेली जिंकली; शिवसेनेचे संसदेत संख्याबळ वाढले

गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी छटपूजेसाठी नियमावली बनवून मर्यादित स्वरुपात परवानगी दिलेली होती. त्याच धर्तीवर वर्षीही परवानगी द्यावी व तसे परिपत्रक जारी करावे, अशी मागणी भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती

आज मितिस २०० लोकांपर्यंत कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे. गणपती विसर्जन आणि नवरात्रौत्सवात दुर्गामाता विसर्जन यासाठी कृत्रिम तलाव / हौद महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये उभारण्यात आलेले होते. त्याच धर्तीवर छठपुजेसाठी कृत्रिम तलाव / हौद महापालिकेच्या अखत्यारितील जागेवर उभारून त्यावर एकावेळी २०० पेक्षा कमी लोकांना कोविड खबरदारीचे सर्व नियम पाळून, मास्क लावून, सामाजिक अंतरचे ध्यान ठेवून छठपुजा करण्याची परवानगी देण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे तयार करावीत. तत्संबधीचे आदेश विभागीय सहाय्यक आयुक्तांना द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here