@maharaahtracity

मुंबई: राज्यात शनिवारी ४,३५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,३९,४४७ झाली आहे. आज १२,९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,३९,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५२,२३८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात शनिवारी ३२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६३,०२,७८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,३९,४४७ (१०.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,१३,४५७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात २३७ ओमीक्रॉन रूग्ण

तसेच राज्यात शनिवारी २३७ ओमीक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ११ रुग्ण बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि २२६ कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई यानी रिपोर्ट केले आहेत. या २३७ रुग्णात पुणे मनपा – ११,
मुंबई -२२६ असल्याचे सांगण्यात आले.

आजपर्यंत राज्यात एकूण ३७६८ ओमीक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी ७२७३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १५३१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत ३४९ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३४९ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५२८४४ रुग्ण आढळले. तसेच ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६८२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here