@maharashtracity

राज्यात आमिक्रॉनचे १० रुग्ण

दोघेजण बाधित असल्याचे निदान

मुंबई: डोंबिवली (Dombivli) आणि पुण्यापाठोपाठ (Pune) मुंबईतही ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची (Omicron patient) संख्या सोमवारी दहावर पोहोचली.

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग (Johannesburg) या प्रांतातून आलेल्या ३७ वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉनचा विषाणू आढळून आला. हा रुग्ण २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत परतला होता. त्याचदिवशी अमेरिकेहून (USA) त्याची ३६ वर्षीय मैत्रीणही मुंबईत आली होती. दोघंही एकत्र राहत असल्याने दोघांनाचीही कोरोना तपासणी (corona test) पॉझिटीव्ह आली होती. मात्र तरुणाने दक्षिण आफ्रिकेहून (South Africa) प्रवास केल्याने जनुकीय निर्धारण तपासणी (genome sequencing) करण्यात आली. यात दोघेही ओमिक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले.

राज्य आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्याही शरीरात कोणतीही लक्षणे आढळलेली नसून या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे (Pfizer) दोन्ही लस घेतले आहेत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) उपचार घेत आहेत.

राज्यात डोंबिवलीत ओमायक्रॉनचा एक, पुण्यात सात तर मुंबईत दोन रुग्ण आढळून आलेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबई, पुणे तसेच नागपूर (Nagpur) आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु असलेली तपासणी सुरु केली असून यात अतिजोखमीचे देशातून ६ हजार २६३ प्रवासी आले. तर इतर देशातून २८ हजार ४३० प्रवासी आले आहेत. असे एकूण ३४ हजार ७०० परदेशी प्रवासी आले असल्याचे सांगण्यात आले.

तर अतिजोखमीचे देशातून आलेल्या ६ हजार २६३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तसेच इतर देशातील ६३५ प्रवाशांची अशी मिळून ६ हजार ८९८ प्रवाशांची चाचणी करण्यात आली.

यातील अतिजोखमीचे देशातील ११ जणांची तर इतर देशातून आलेल्या १ प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here