@maharashtracity

राज्यात ४१,४३४ तर मुंबईत २०३१८ नवे रूग्ण

मुंबई: राज्यात शनिवारी ४१,४३४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची (corona patients) नोंद झाली असली तरी शनिवारी १३३ ओमिक्रॉन बाधितांची नवी नोंद झाल्याने राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची (omicron patients) संख्या आता हजार पार झाली असल्याने चिंता वाढली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १००९ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यात ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका असा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) इशाऱ्यामुळे गांभीर्य वाढले आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी १३३ ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. शनिवारच्या १३३ रुग्ण पैकी १३० भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (Indian Institute of Science Education and Research – IISER) आणि ३ रुग्ण गुजरात (Gujarat) राज्याने रिपोर्ट केले आहेत.

या १३० बाधितांमध्ये पुणे मनपा ११८,
पिंपरी चिंचवड ८, पुणे ग्रामीण- ३,
वसई विरार २, अहमदनगर आणि मुंबई प्रत्येकी १ असे असल्याचे सांगितले.

आजपर्यंत राज्यात एकूण १००९ ओमिक्रॉन रुग्णांपैकी ४३९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RT-PCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३०७६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात शनिवारी ४१,४३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८,७५,६५६ झाली आहे. शनिवारी ९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६५,५७,०८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७% एवढे झाले आहे.

राज्यात शनिवारी १३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०३,४२,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६८,७५,६५६ (९.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,४५,०८९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर १८५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

मुंबईत दिवसभरात २०३१८

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३१९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ८९३०४८ एवढी झाली आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६३९९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here