@maharashtracity

मुंबई विमानतळावर ८ नव्या आमिक्रॉन रुग्णांची नोंद

मुंबई: राज्यात गेल्या दोन दिवसांत ओमिक्रॉनबाधित (Omicron) नवे ११ रुग्ण आढळले असून आता राज्यात एकूण ६५ ओमियक्रॉनचे रुग्ण झाले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तपासणीतून ८ नवे रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे जनुकीय चाचणीच्या (Genome sequencing) अहवालातून समोर आले. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान परिषदेने (NIV) या आठ रुग्णांसह नवी मुंबई (Navi Mumbai) आणि उस्मानादमध्येही (Osmanabad) प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाल्याचे स्पष्ट केले.

मुंबईतील आठ रुग्णांपैकी दोन रुग्ण अठरा वर्षांखालील आहे. उस्मानाबादमधील १३ वर्षांची रुग्ण मिळून तीन लहान मुलांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे मंगळवारी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी ओमिक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नव्हता. उपचाराअंती केवळ तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले. मंगळवारीही राज्यातील विविध भागांत ओमिक्रॉनवर यशस्वी उपचार केल्यानंतर अजून तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली असली तरीही ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या केवळ ३१ रुग्णांवर ओमायक्रॉनसाठी उपचार दिले जात आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आढळलेल्या नव्या ८ रुग्णांपैकी ५ रुग्ण मुंबईतील रहिवासी आहे. उर्वरित ठाणे (Thane) व गुजरात (Gujarat) आणि केरळ (Kerala) राज्यातील रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

प्रत्येकी दोन रुग्णांनी युंगाडा (Uganda) आणि दुबईतून (Dubai) प्रवास केला असून उर्वरित ४ रुग्णांनी इंग्लंडहून (UK) प्रवास केला आहे. यातील १८ वर्षांखालील दोन रुग्णांनी लस घेतलेली नाही. बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र काहींना सौम्य लक्षणे आहेत.

दरम्यान उस्मानाबादमधील ओमिक्रॉनबाधित रुग्णाच्या १३ वर्षाच्या मुलीच्या जनुकीय चाचणीतून तिलाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तिला कोणतीही लक्षणे नसल्याचे सांगण्यात आले. तर केनियावरुन (Kenya) हैदराबादमार्गे (Hyderabad) आलेल्या नवी मुंबईतील १९ वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉन झाल्याचे निदान करण्यात आले. या रुग्णाचे लसीकरण (vaccination) पूर्ण झाले असून, तो लक्षणेविरहीत (asymptomatic) असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here