@maharashtracity

ऍमिक्रॉन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय

मुंबई: दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन (बी.१.१.५२९) धुमाकूळ घालत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या प्रवासाचे टप्पे तपासले जाणार आहेत. परदेशातून येणारा प्रवासी कोविड पॉजिटीव्ह आढळून आल्यास त्याचे नमूने जिनॉम सिक्वेसिंगसाठी (Genome Sequencing) देण्यात येणार असल्याचे महानगर पालिकेकडून (BMC) सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दिड वर्षापूर्वी भारतात पसरलेला कोरोना संसर्ग (corona pandemic) परदेशातून आलेल्या प्रवाशामध्ये आढळून आला होता. तर ९ मार्च रोजी मुंबईत आलेला प्रवासी कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे सिद्ध झाले होते.

या पार्श्वभूमीवर आता दक्षिण अफ्रिकेत (South Africa) पसरलेल्या नव्या ओमिक्रॉन वेरियंटचा (omicron variant) संसर्ग मुंबईत पसरू नये यासाठी मुंंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच या प्रवाशाला संस्थात्मक अलगीकरण (Institutional quarantine) ठेवण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या चाचणीत प्रवासी पॉजिटीव्ह आढळून आल्यास त्याचे नमुने जिनॉम स्क्विसिंगसाठी पाठविण्यात येणार आहे.

या चाचणीतून कोरोनाचा वेरियंटचा अभ्यास करण्यात येणार आहे. यामुळे वेरियंट ओमिक्रॉन असल्यास लगेचच समजून येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रांचे स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रीक ऑडीट (Structural, fire and electric audit of covid centres/hospitals) करण्यात येत आहे.

तसेच रुग्णालयातील कृत्रिम प्राणवायू सुविधा (oxygen cylinders), व्हेंटीलेटर्स (ventilators) यासह वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. जिनॉम सिक्वेसिंगमध्ये पॉजिटिव्ह रुग्ण अॅमिक्रॉन वेरिंयंटचा आढळल्यास त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारले असून उपचार करण्यात येणार आहेत.

दक्षिण अफ्रिकेसह ऑस्ट्रिलिया, इटली, जर्मनी, नेदरलँड, ब्रिटन, इस्त्रायल, बेल्जिअम, हाँगकाँग या देशातून एक ते दोन असे रुग्ण आढळले असल्याचे या देशातून सांगण्यात आले आहे. अशा अतिजोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसात आलेल्या प्रवाशांची माहिती राज्य सरकारकडून महापालिकेला देण्यात येणार आहे. पालिका त्यानुसार या प्रवाशांची आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here