@maharashtracity

मुंबई: पदमश्री डॉ. तात्याराव लहाने (Padma Shri Dr Tatyarao Lahane) कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या कोरोनाची (corona) तिसरी लाट सुरु झाली असून बाधितांचे प्रमाण सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, राजकीय नेते, तसेच सिलेब्रिटी देखील पॉझिटिव्ह होत असल्याच्या घटना वाढत आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नेत्र तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचे कोरोना नमुने बाधित असल्याचे समोर येत आहे. यावर डॉ. लहाने यांना संपर्क केला असता त्यांनी दुजोरा दिला. मात्र आपण ठीक असल्याचे सांगत कोणतेही लक्षण नसल्याचे डॉ. लहाने म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here