@maharashtracity

नवा वेरियंट आणि नव्या नियमावलीमुळे पालकांच्या मनात शंका

मुंबई: दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन हा नवा वेरियंट (omicron variant) सापडला असून तो लसीकरणाला ही जुमानत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) घोषित केल्यापासून प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांचे धस्तावले आहेत.

१ डिसेंबर पासून पहिली ते चौथी व पुढे सातवी पर्यंतचे वर्ग खुले करणार असल्याचे प्रशासनाकडून घोषित केले आहे. या घोषणेला घेऊन नव्या वेरियंटचा विचार करता पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा विचार पालक करत आहेत.

ओमिक्रॉन या वेरियंटमुळे जगभरात भीती पसरली आहे. या विषाणूची तीव्रता सांगताना हा वेरियंट लसीकरणाला (vaccination) जुमानत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून ही दहशतीची तीव्रता वाढत आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून प्राथमिक वर्ग खुले (reopening of primary schools) करण्याचा निर्णय घेतला असल्याने पालकांमध्ये संभ्रम पसरले आहे. तसेच नव्या वेरियंटच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून राज्य सरकारने नवीन कोरोना नियमावली सुरु केली असून नियमभंग झाल्यास कडक कारवाईचा इशारा या नियमावलीतून देण्यात आला आहे.

Also Read: पॉजिटीव्ह परदेशी प्रवाशांची जिनॉम चाचणी होणार!

याच काळात शाळा सुरु केल्यास मुलांच्या आरोग्याचे काय असा प्रश्न काही पालक (parents) उपस्थित करत आहेत. त्याच वेळी कोरोना सुरु झाल्यापासून प्राथमिक वर्ग बंद ठेवल्याने मुलांच्या मनावर देखील दडपण आले असल्याचे पालक सांगतात. शाळा सुरु केल्यास नव्या कोरोना नियमांचे पालनही आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे न झाल्यास मुलांना धोकादायक ठरु शकते असे मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन शिक्षणाला (online education) महत्व दिल्यास मुलांसाठी फायदेशीर ठरेल असे काही शिक्षक पालक संघटनांचे म्हणणे आहे. लस उपलब्ध झाल्यापासून शिक्षकांनी (teachers) देखील लसीकरण करुन घेतले असेल का असा सवालही काही पालक उपस्थित करत आहेत.

कारण १८ वर्षाखाली मुलांना अद्याप लस उपलब्ध नसून मुले लसीविना शाळेत पाठविण्यास काही पालक तयार नसल्याचा सूर ही यातून दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here