@maharashtracity

मुंबई: भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवप्रित्यर्थ केंद्र सरकारच्‍या सुचनेनुसार विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. याचाच एक भाग म्‍हणून ‘कचऱ्यापासून कला’ या विषयावर प्रदर्शन प्रस्‍तावित आहे. या प्रदर्शनामध्‍ये सहभाग नोंदविण्‍यासाठी इच्‍छुक संस्‍थांनी greenmumbai.report@gmail.com या इमेलवर तपशिल पाठवावा, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि या वर्षांमधील साध्‍य कामगिरी साजरी करण्यासाठी भारत सरकारने ‘आजादी का अमृतमहोत्सव (AKAM)’ हा उपक्रम आयोजित केला आहे. केंद्र सरकारच्या नागरी व गृहनिर्माण मंत्रालयाच्या निर्देशानुसार, दिनांक २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

कचऱ्याचे विलगीकरण करणे, जनसहभागातून सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, ‘कचऱ्यापासून कला’ संकल्पनेवर प्रदर्शन आणि सफाईमित्र अमृत सन्मान समारंभ असे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार, मुंबईमध्ये ‘आजादी का अमृतमहोत्सव (AKAM)’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजित आहे. सध्‍याच्‍या कोविड-१९ विषाणू संसर्ग काळातील प्रतिबंधात्‍मक बाबींचे / निर्बंधांचे पालन करून हे उपक्रम राबविले जाणार आहेत.

दिनांक १ ऑक्‍टोबर २०२१ रोजी ‘कचऱ्यापासून कला’ या संकल्पनेवर मुंबईमध्ये प्रदर्शन आयोजित करण्याचे प्रस्‍तावित आहे. या अनुषंगाने प्रदर्शनामध्ये सहभागी होवून प्रदर्शन करु इच्छिणाऱ्या संस्थांनी, आपल्या संस्थेचा पूर्ण तपशिल ‘greenmumbai.report@gmail.com’ या ई-मेलवर दिनांक २६ सप्‍टेंबर २०२१ पर्यंत पाठवावा.

त्यानुसार निवड केलेल्या संस्थांशी महानगरपलिकेतर्फे संपर्क साधण्‍यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here