@maharashtracity

प्रस्ताव राखून लटकला

मुंबई: कोरोना कालावधीत विलगिकरणासाठी वापरण्यात आलेल्या २३४ हॉटेल चालकांना चार महिन्याचा मालमत्ता करात सूट देण्यास (congress opposes waive off property tax to hotels) कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेते रवी राजा (Opposition Leader Ravi Raja) यांनी विरोध दर्शविला आहे. आज यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर न होता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवला आहे.

पालिकेने या हॉटेलमध्ये नागरिकांना कोरोना कालावधीत कोणत्या सुविधा, किती दरात देण्यात आल्या याबाबतची माहिती सादर केल्यानंतर या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगत यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांनी प्रस्ताव राखून ठेवला.

कोरोना कालावधीत मुंबईतील ज्या २४१ हॉटेल्समध्ये नागरिकांना विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते, त्या नागरिकांनी त्या त्या हॉटेल चालकांना राहणे, खाणेपिणे यांचा सर्व खर्च त्याच वेळी अदा केला होता.

या हॉटेलमध्ये कोणालाही मोफत सुविधा देण्यात आलेली नव्हती. तर मग या हॉटेल चालकांना मालमत्ता करात उगाचच ४१ कोटी रुपयांची सूट का द्यायची, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णालयातील बेड कमी पडू लागले असताना महापालिकेने विगलीकरणासाठी काही हाॅटेल्स ताब्यात घेऊन त्यांचा वापर केला होता.

कोरोनाचा आर्थिक फटका बसलेल्या या हॉटेलची खूप चांगली मदत झाली. त्यामुळे या बाबीकडे सकारात्मक दृष्टीने बघता मुंबई महापालिकेने या हॉटेल चालकांना मालमत्ता करात सलग दुसऱ्यांदा सूट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता रवी राजा यांनी, त्यास कडाडून विरोध केला आहे.

सदर प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यास काँग्रेस तीव्र विरोध करणार आहे, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

महापालिकेने कोरोना कालावधीत विलगीकरणासाठी वापरण्यात आलेल्या १८० हॉटेल चालकांचा २० कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ केला होता. आता २३४ मालमत्तांना चार महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे ४१ कोटी ८७ लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार असल्याने काँग्रेसने त्यास विरोध दर्शवल्याने सत्ताधारी शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर करावयाचा झाल्यास काँग्रेसची साथ घ्यावीच लागणार रवी राजा यांची मनधरणी करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here