@maharashtracity

मुंबई: नायर आणि सायन रुग्णालयातील पोस्ट ग्रॅज्युएट ऍक्युप्रेशनर आणि फिजिओथेरपीचे विभागातील निवासी डॉक्टरानी गेल्या 9 महिन्यांपासून रुग्णालयातील संबंधित विभागाकडे आपल्या मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना फक्त तोंडी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सूरु केले आहे. यात ७४ डॉक्टर सहभागी आहेत. (No work protest by PG doctors in Sion and Nair Hospital)

दरम्यानच्या काळात पालिकेकडून रुग्णसेवेसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यातून हे विद्यार्थी मे 2020 पासून आजपर्यंत कोविड रुग्णसेवा देत आहेत. यात कोविड आयसीयू, वॉर्ड, स्क्रीनिंग अशी कामे 5 तास करत असून अन्य 5 तास नॉन कोविड वॉर्ड मध्ये रूग्ण सेवा देतात.

जानेवारी पर्यत केवळ 10 हजार स्टायपेंड सोबत कोविड भत्ता म्हणून अतिरिक्त 10 हजार दिले जात होते. मात्र फेब्रुवारी पासून कोविड भत्ता देखील देणे बंद केले असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. (No stypend for service during corona pandemic)

कोरोनाच्या काळात निवासी डॉक्टरांनी दिलेल्या योगदानासाठी सरकारने दिलेला एक लाख 21 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचे मान्य केले. मात्र, यात सामावून घेत नसल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली. मार्ड प्रमाणे आमचा टीडीएस कापून घेतला जात आहे. त्यांना यातून सवलत मिळाली त्याप्रमाणे आम्हालाही सवलत मिळावी. सर्वांना समान स्टायपेंड देणे अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे.

मार्ड प्रमाणे लेखी पत्र मिळेपर्यंत आम्ही संप करत राहणार असल्याचे पीजीचे निवासी डॉक्टर सांगतात. यावर बोलताना प्रमुख पालिका रुग्णालये संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, मार्ड प्रमाणे यांचे देखील निवेदन सरकारकडे पाठविले असून कामबंद आंदोलन हा यावर उपाय नसल्याचे डॉ. भारमल म्हणाले.

काही मागण्या मान्य होण्यासाठी काही वेळ लागेल मात्र यावरील पाठपुरावा सुरु असल्याचे ही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here