जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन विशेष
Twitter : @maharashtracity
मुंबई
प्लास्टिक सर्जरी म्हणजेच सुघटनशल्य शस्त्रक्रियेतून शरीरावर होणाऱ्या कर्करोग, अपघात, जंतुसंसर्ग किंवा जन्मजात दोष विकृतींचे पुनर्रचना करता येते, अशी माहिती प्लास्टिक सर्जन तज्ज्ञांनी दिली. १५ जुलै हा जागतिक प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर प्लास्टिक सर्जन्स संघटनाकडून अनेक उपक्रम आयोजित केले जातात. या संबंधित गैरसमज व शस्त्रक्रियेचे अनेक घटक या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्लास्टिक सर्जन एकत्र आले होते. प्लास्टिक सर्जरीतील शास्त्रशुद्ध माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमातून साधण्यात आला. नायर रुग्णालयातील सुघटनशल्य चिकित्सा विभाग, प्लास्टिक सर्जरी फाऊंडेशन आणि स्कूल्फी या संस्थेने सुघटन शल्यचिकित्सा जनजागृती उपकम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमात अनेक सुघटन शल्य शस्त्रक्रिया अनुभवलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सामान्य नागरिक त्याच बरोबर मुंबईचे वरिष्ठ सुघटन शल्यचिकित्सक डॉ. रवीन थत्ते, डॉ. अरविंद वर्तक, डॉ. बिमल मोदी, डॉ. सीताराम प्रसाद व डॉ विनिता पुरी ह्यांनी उपस्थिती लावली होती. ह्या कार्यक्रमाची सुरवात डॉ. अमित पेसवानी, सहाय्यक प्राध्यापक नायर रुग्णालय यांनी सुघटन शल्यचिकित्सा दिवसाचे परिचय व त्याचे महत्व ह्या विषयावर माहिती सादर केली. त्यानंतर डॉ. उदय भट, सुघटन शल्य चिकित्सा विभाग प्रमुख, नायर रुग्णालय यांनी सुघटन शल्य शस्त्रक्रियांचे विविध घटक, त्याबद्दल असलेले गैरसमज विषयांवर माहिती दिली.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निशा जमवल यांनी स्वतःचे सुघटन शस्त्रक्रियेचे असलेले अनुभव सांगितले. सुघटन शल्यचिकित्सा क्षेत्राशी संबंधित असलेल्या विविध संघटनाबरोबर ते काम करत असतात. त्यांचा डॉ. अनिल टिबरेवाला,वरिष्ठ सुघटन शल्य चिकित्सक व डॉ उदित दालमिया यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचवेळी उपस्थित रुग्णांनी त्यांचे सुघटन शल्य शस्त्रक्रियेचे अनुभव सांगितले. तिथे कर्करोगातून, अग्नि अपघातानंतर बरे झालेले रुग्ण, दोन्ही हात प्रत्यारोपण केलेले रुग्ण, त्याच बरोबर नाकावर सौदर्यवर्धक शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांनी अनुभव सर्वांसमोर मांडला.
सुघटन शल्य शस्त्रक्रियेनंतर त्यांचा आयुष्यावर झालेला बदल व परिणाम हे त्यांच्या कथानवरून कळत होते. तसेच सुघटन शल्य शस्त्रक्रियेत फक्त सौन्दर्यवर्धक शस्त्रक्रिया नसून इतर महत्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाची मूळ कल्पना ही वरिष्ठ सुघटन शल्यचिकित्सक डॉ अमरिश बलियारसिंग असून ते या पूर्वी भारतीय सुघटन शल्यचिकित्सक संघटनेचे अध्यक्ष व नायर रुग्णालय सुघटन शल्य शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत.