मुंबईत संततधार; मात्र उपद्रव नाही

Twitter : @maharashtracity

मुंबई

गेल्या आठवड्यापासून मान्सूनला बऱ्यापैकी सूर गवसला असून मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. मात्र सोमवारच्या पावसाने शहरात उपद्रवाची तक्रार पालिकेकडून मिळाली नाही. दरम्यान, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आगामी पाच दिवस पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आणि धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसाठी मंगळवारी येलो अलर्ट तर बुधवारसाठी आरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

source : Indian Meteorological Department

दरम्यान, रविवारनंतर सोमवारी देखील मुंबईत पावसाची रिपरिप सुरु होती. सोमवारी सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ४४.०८, पूर्व उपनगरात ३९.०८ तर पश्चिम उपनगरात ३२.७५ मिमी एवढा पाऊस झाल्याचे मुंबई वेधशाळेने सांगितले. यावर बोलताना मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. दक्षिण झारखंड आणि लगतच्या क्षेत्रात सायक्लॉनिक सर्कल आहे. मान्सून टफची स्थिती अनुकुल आहे. येणाऱ्या ४८ तासात वायव्य बंगालच्या उपसागरात आणखी एक सायक्लॉनिक सर्कल निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात १७ ते २१ जून दरम्यान मान्सून सक्रिय राहणार आहे. या स्थिती मुळे कोकण, रायगड घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here