Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मार्वे किनाऱ्यावर रविवारी चार ते पाच मुले गेली होती. समुद्राची मौज लुटण्याच्या तयारीत त्या मुलांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र, अर्धा किलोमीटर समुद्रात गेलेल्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती मुले रविवारी सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास पाण्यात बुडाली. किनारपट्टीवर उपस्थितांना ही माहिती मिळताच त्यांनी दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तीन मुले बेपत्ता होते. या बेपत्ता मुलांचा महापालिका पालिका यंत्रणा शोध घेत होती. दरम्यान, बेपत्ता असलेल्या तीन मुलांचा सोमवारी सकाळी मृतदेह सापडला असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुले बुडत असल्याचे दिसताच तेथे उपस्थित पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. यावेळी कुरशाना हरिजन (१६) व अंकुश शिवरे (१३) या दोघांना स्थानिकांनी सुखरुप बाहेर काढले. मात्र निखील साझी कायांपुर (१४), अजय हरिजन (१४) आणि शुभम राजकुमार (१४) या तीन बेपत्ता मुलांचे मृतदेह सोमवारी आढळून आले.

रविवारी चार ते पाच मुले गेली होती. समुद्राची मौज लुटण्याच्या तयारीत त्या मुलांनी समुद्रात उड्या घेतल्या. मात्र अर्धा किलोमीटर समुद्रात गेलेल्या मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ती मुले रविवारी सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास पाण्यात बुडाली. किनारपट्टीवर उपस्थितांना ही माहिती मिळताच त्यांनी दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तीन मुले बेपत्त होते. या बेपत्ता मुलांचा पालिका यंत्रणा शोध घेत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here