@maharashtracity

50 हून अधिक दात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

धुळे: ओमायक्रॉन (Omicron) उत्प्रेरीत विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रक्ताचा तुटवडा (shortfall of blood) पडू नये, याकरीता सेंट अ‍ॅन्थनी स्कूल, युगंधर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर (blood donation camp) घेण्यात आले. या शिबीरात अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सपत्नीक तर न्यायाधीश (Judge), शिक्षीका यांच्यासह 50 हून अधिक दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

धुळे (Dhule) जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे. त्यात कोरोना महामारीची (corona pandemic) भीती अजूनही संपलेली नाही. पुन्हा ओमायक्रॉनच्या प्रसाराची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सेंट अ‍ॅन्थनी स्कूल व युगंधर फाउंडेशन (Yugandhar Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने अ‍ॅन्थनी स्कूल आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

दात्यांनी रक्तदान करावे, असेही आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डॉ. दीपक डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पत्नी स्मिता बच्छाव यांच्यासह 50 हून अधिक दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी फादर विल्सन रोड्रिक्स, राखीव पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ चौधरी, राखीव पोलीस निरीक्षक प्रतिभा भरोसे, ए.जी. बोराडे, मधुकर मोरे, शंकर जगवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here