@maharashtracity

By मिलिंद माने

महाड (रायगड): पावसाळ्यापूर्वी म्हणजे मान्सूनपूर्व नाले सफाईचे काम सहसा मे महिन्यात केले जाते. मात्र, महाड नगरपालिकेने ही कामे ऐन थंडीत म्हणजे जानेवरीत काढली आहेत. ही नाले सफाईची कामे सध्या कार्यरत असलेल्या ठेकेदारांकडूनच केली जात असल्याने यात काही काळे बरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ठेकेदार आणि पालिकेतील अधिकारी यांचे काही संगनमत आहे का? अशी चर्चा पालिकेतील वर्तुळात आहे.

महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून शहरांतील स्वच्छता नियमित होत असल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षांत मात्र नाले गटारे यांची सफाई वर्षातुन केवळ पावसाळा सुरु होण्यापूर्वी केली जात असल्याचे दिसून येते (pre- monsoon nullah cleaning). यावर्षी मान्सूनपूर्व आणि आचारसंहिता पूर्व काळातच नालेसफाई सध्या अस्तित्वात असलेल्या स्वच्छता ठेकेदाराकडून (contractor) केली जात आहे.

महाड (Mahad) शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस आणि त्यांतुन निर्माण होणारी कचरा समस्या मोठी आहे. ही कचरा समस्या स्वछता अभियानाने काही अंशी दूर झाली असली तरी नागरिक आणि व्यावसायिक यांच्याकडून होत असलेल्या चुकांबाबत कारवाई होत नाही.

शहरांतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी असलेला प्रमुख नाला सुमारे दोन अडीच किलो मिटर लांबीचा आहे. हा नाला वास्तविक वर्षातून दोन ते तीन वेळा साफ करणे आवश्यक आहे. हा नाला दोन वेळा साफ करण्यांत आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यांत येते.

कोरडे नाले, पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नाले सफाई आणि पावसाळ्यानंतर केली जाणारी नाले सफाई अशा तीन भागात हि नाले सफाई केली जाते.

शहरांतील कुभारआळी, सरेकर आळी, कोटेश्वरी तळे, काकरतळे, जवाहर नगर सोसायटी, प्रभात कॉलनी, रोहिदास नगर, नवेनगर, सुतार आळी, पानसरे मोहल्ला, खारकांड मोहल्ला, देशमुख मोहल्ला, सुलतान गल्ली, काजळपुरा, कोट आळी, मच्छी मार्वेâट, भोई घाट तांबट आळी, चवदार तळे, दस्तुरी नाका, गोमुखी आळी, भीम नगर या प्रमुख वसाहती मधील गटारे आणि नाले साफ करण्याचे काम केले जाणार आहे.

शहरांतील प्रमुख नाला लायन्स क्लब इमारत ते भोई घाट असा असून या नाल्यामध्ये शहरांतील सर्वाधिक सांडपाणी वाहून नेण्याची सोय करण्यांत आलेली आहे. लायन्स क्लब ते बाजार पेठेतील लोखंडी पुल या दरम्यांन ४४६ मिटर लांबीच्या नाल्याची सफाई वर्षातुन एक वेळ करण्यांत येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here