@maharashtracity

मुंबईत म्युकरचे ६४ सक्रिय रुग्ण

मुंबई: मुंबईतील म्युकरमायकोसीस नियंत्रणात (mucormycosis under control in Mumbai) येत असल्याचे वृत्त आहे. सध्या म्युकरमायकोसिसचे केवळ ६४ सक्रिय रुग्ण आहेत.

म्युकरच्या सक्रिय रुग्णांमध्ये मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असून पुणे (Pune) जिल्हा पहिला तर अमरावती (Amravati) जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात १० हजार ३२५ जणांना म्युकरमायकोसीसचा संसर्ग झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरचा संसर्ग प्रामुख्याने समोर आला. कोरोना संसर्ग, मधुमेह आणि उपचारावेळी स्टेरॉईडचा जादा वापर केल्यामुळे म्युकर आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आता मुंबईसह राज्यात कोरोनासह (corona) म्युकरमायकोसीसही नियंत्रणात आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्यात सध्या ७७९ म्युकरचे सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत म्युकरमुळे १ हजार ३८४ रुग्णांचा मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here