@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोरोना जोर कमी होत असताना पावसाळी आजारांचा उच्छाद सुरु झाल्याचे मुंबई पालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. यात पहिल्या क्रमांकावर मलेरियाचे रुग्ण असून गॅस्ट्रो आणि डेंग्यूचे रुग्ण देखील वाढत असल्याचे दिसून येते. (Rise in dengue and gastro patients)

मुंबईत (Mumbai) जानेवारी ते २४ ऑक्टोबरपर्यंत मलेरियाचे (malaria) ४,४८५ रुग्ण तर डेंग्यूचे (Dengue) ६८९ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या डेंग्यू रुग्णांच्या तुलनेत यंदा रुग्णांमध्ये चार ते पाच पटीने वाढ झाली आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये डेग्यूंचे फक्त १५ रुग्ण सापडले होते तर, ही संख्या यंदा वाढून २१३ वर पोहोचली असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Also Read: लसीकरणाच्या ट्रायलसाठी १७ मुलांची नोंद

गेल्या वर्षाच्या तुलनेत गॅस्ट्रो (gastro) आणि चिकनगुनियाच्या (chikungunya) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. तर गेल्या वर्षी गॅस्ट्रोचे १०२ तर चिकनगुणियाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. यंदा मात्र ऑक्टोबरच्या १७ दिवसांत गॅस्ट्रोचे १९३ तर चिकनगुणियाचे ४५ रुग्ण आढळले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू सर्वाधिक दिसून येत आहे. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षात १२९ डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. मात्र यंदा ६८९ रुग्ण आढळून आले तर ३ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेची चिंता वाढलेली असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो आणि चिकनगुनिया यासारख्या साथरोगाने डोके वर काढले आहे. मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील वाढले आहेत. यात ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे २४ दिवसांत ४८२, डेंग्यूचे २१३, लेप्टोचे २९ तर गॅस्ट्रोचे १९३ रुग्ण सापडले आहेत.

मलेरिया आणि डेंगू च्या आजारात वाढ होताना पाहायला मिळते त्याच प्रमाणे यंदाही तशीच रुग्ण संख्या आहे.

१ जानेवारी ते २४ ऑक्टोबरपर्यंत

आजार रुग्ण

मलेरिया ४४८५
लेप्टो २०८
डेंग्यू ६८९
चिकणगुनिया ४५
गॅस्ट्रो २३१०
हेपेटायटीस २२३
स्वाईन फ्लू ६१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here