@maharashtracity

पनवेल फार्महाऊसमधील घटना

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) शनिवारी २६ डिसेंबर रोजी साप चावला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही तो नाताळ (Christmas) साजरा करण्यासाठी पनवेल (Panvel) येथील त्याच्या फार्म हाऊसवर (Farm House) गेला होता. याठिकाणी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सलमानला साप (snake bite) चावला.

त्यानंतर लगेचच अभिनेत्याला कामोठे एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) दाखल करण्यात आले. सुदैवाने हा साप विषारी नव्हता, त्यामुळे सलमान थोडक्यात बचावला. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. सकाळी ९ वाजता ते त्यांच्या फार्महाऊसवर परतले. सध्या सलमानची प्रकृती ठीक असून तो धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, सलमान खान याचे मुंबईला लागून असलेल्या पनवेलमध्ये १५० एकरमध्ये फार्म हाऊस पसरले आहे. या ठिकाणी तो दरवर्षी ख्रिसमस आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी येत असतो. सलमान खान याचा २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे.

डोंगराळ भागात वसलेले या फार्म हाऊसमध्ये साप आणि अजगर नेहमीच दिसून येत असतात. हे फार्म हाऊस जंगलाने वेढलेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here