@maharashtracity
११ जिल्ह्यात सरासरीच्या १.०२ टक्क्याहून पॉजिटीव्हीटी दर अधिक
मुंबई: राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आठवड्यातील पॉजिटीव्हीटी दर (positivity rate) राज्याच्या सरासरी पॉजिटीव्हीटी दराहून १.०२ टक्के अधिक आहे.
यात अकोला (२.७७ टक्के), अमरावती (२.५६ टक्के), बुलढाणा (२.३३ टक्के), सिंधुदुर्ग (२.२१ टक्के), पुणे (२.०७ टक्के), बीड (१.७९ टक्के), नाशिक (१.८७ टक्के), सोलापूर (१.३९ टक्के), पालघर (१.३४ टक्के), अहमदनगर (१.३१ टकके) आणि सांगली (१.०९ टक्के) हे जिल्हे आहेत.
मात्र हा दर ५ टक्क्याहून कमी असल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
यावर बोलताना राज्य साथरोग निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr Pradip Awate) यांनी सांगितले की, एकूण पॉजिटीव्हीटी दरात घट झाली असून ५ टक्क्यांहून अधिक सकारात्मकता दर नसलेले कोणतेही जिल्हे नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
मात्र आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण लक्ष अधिक पॉजिटीव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यांवर असून तेथील संसर्ग कमी करण्यासाठी नियोजन आखले जाते. सध्या राज्यात नवे कोरोना रुग्ण आणि सक्रिय रुग्ण कमी होत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या दुसरी लाट रेंगाळताना दिसत असून त्यातून तिसऱ्या लाटेला (third wave of corona) उशिर होत आहे. मात्र, कोविड (covid) कमी करण्याकडे आरोग्य यंत्रणा अधिक भर देत आहे.
हा दर ५ टक्क्यांहून अधिक नसला तरीही हा ही दर कमी करण्यावर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी लसीकरण आणि कोविड वर्तणुकीवर सर्वांनीच भर दिला पाहिजे असे सुचविण्यात येत आहे.