@maharashtracity

नागपूर: राज्याच्या माजी मंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस (Shobhatai Fadnavis) यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस (वय ५४) यांचे आज बुधवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने नागपुरात (Nagpur) निधन झाले.

अभिजीत यांना नागपुरातच हृदयाचा तीव्र झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे ते चुलत बंधु होते. अभिजित फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here