@maharashtracity

मुंबई: ऐन दिवाळी सणाला मुंबईत काही ठिकाणी पाणी समस्या भेडसावत (Water problem in some places in Mumbai on Ain Diwali Festival) आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत ( Standing Committee Meeting) उमटले.

विरोधी पक्षनेते रवी राजा ( Leader of the Opposition Ravi Raja ) यांनी, त्यांच्या विभागात पाणी समस्या निर्माण झाल्याची तक्रार करीत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाच्या निषेधार्थ मांडलेली झटपट सभातहकुबी एकमताने मंजूर करण्यात आली.

मुंबईला ( Mumbai) पाणीपुरवठा ( Water supply) करणाऱ्या तलावांत यंदा भरपूर पाऊस पडला व तलाव भरले. पुढील वर्षभराचा पाणीसाठा तलावांत जमा झाला. त्यामुळे यंदा पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार नाही, असे समजून मुंबईकर आनंदित होते.

मात्र आता पावसाळा संपून काही दिवस उलटले असताना पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या विभागासह आणखीन काही विभागात पाणी समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

Also Read: लस घेऊनही डेल्टा वेरियंटमुळे कोरोना संसर्ग

दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीत पाण्याची बोंबाबोंब झाल्याने पालिका मुख्यालय ( BMC) हादरले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षमेते रवी राजा यांना, त्यांच्या विभागात पाणी समस्या निर्माण झाली असून त्यास संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी, शिवसेना ( shivsena) , भाजप (bjp) , काँग्रेस ( congress) पक्षाच्या नगरसेवकांनीही त्यांच्या विभागातील पाणी समस्येला वाचा फोडली.

मात्र प्रशासकीय अधिकारी समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने रवी राजा यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी झटपट सभा तहकुबी मांडली. त्यास सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here