@maharashtracity

मुंबई: कोरोना काळात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( Serum institute of india) संस्थेने कोविड लस ( Corona vaccine) उत्पादन करुन संजीवनी दिली आहे. अशा विशेष प्रकारच्या जैविक तंत्रज्ञान उत्पादनातील अतुलनीय कार्याची दखल घेऊन या वर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकासाठी ( Yashwantrao Chavan State Level Award ) सिरम इन्स्टिट्युटची निवड करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला असल्याचे प्रतिष्ठानकडून सांगण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्ती अथवा संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते.

यंदा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेस हे पारितोषिक जाहीर झाले आहे. रोख रक्कम २ लाख रुपये व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजे बुधवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०२० या दिवशी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात त्याचे वितरण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here