@maharashtracity

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचा उपकम

१ डिसेंबर जागतिक एड्स दिन विशेष बातमी

मुंबई: एचआयव्ही बाधित रुग्णांना कोविड काळ परिक्षेचा गेला. हे एड्सबाधित आर्थिक, आरोग्याच्या किंवा कोणत्याही भावना कोणाकडे व्यक्त करु शकले नाहीत. अशा परिक्षा काळातील त्यांच्या भावनांची उकल मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने करावयाची ठरवली आहे.

जागतिक एड्सदिनापासून ६० वर्षावरील एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप सुरु करण्याचे ठरवले असल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी (MDACS) जागतिक एड्सदिनापासून (World Aids day) एड्सग्रस्तांसाठी दोन उपकम सुरु करणार आहे. पहिल्या उपकमाच्या माध्यमातून एचआयव्ही बाधितांमधील असंसर्गजन्य आजारांसाठी एक मोहिम आखण्यात येत आहे. यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी एआरटी सेंटरमध्ये (ART Centre) नियमित तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत.

हायपर टेंशन (High BP) आणि डायबेटीक (Diabetic) सारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी एचआयव्ही बाधितांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. आचार्य म्हणाल्या. तर दुसऱ्या उपकमात ६० वर्षावरील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप तयार करण्यात येत आहे. यातून ते परस्परांना आधार देऊ शकतील.

Also Read: वरळी येथे बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट; ४ जण जखमी

त्यांच्या अडीअडचीणमध्ये ते लोक परस्परांना मदत करु शकतील. हा सपोर्ट ग्रुप (Support Group) तयार करण्याचे कारण म्हणजे या रुग्णांना कोविड (covid) काळात कोविडची भिती तर होतीच. शिवाय त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यां वाढल्या होत्या. मात्र आपल्या समस्यांवर ते कोणाशी बोलू शकत नव्हते.

त्यांच्यासारखेच इतर रुग्णही असल्याने या रुग्णांनी परस्परांशी चर्चा केली तर त्या समस्या किमान दुसऱ्यासमोर व्यक्त तरी होतील. शिवाय हे सर्व रुग्ण ज्येष्ठ म्हणजे समवयस्क असल्यास परस्परांना समजून घेण्यास सोपे जाणार आहे. त्यातून त्यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे.

एआरटी सेंटर्समध्ये एड्स दिनी विविध कार्यक्रम आखले जातात. या कार्यक्रमातून रुग्णांचे स्क्रिनिंग शिवाय कॅल्शिअम तपासणीचे काम करण्यात येईल. कॅल्शिअमच्या गोळ्या देण्यात येणार असल्याचे डॉ. आचार्य म्हणाल्या. १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनापासून मधुमेह तपासणी सुरु करण्यात आली असून सपोर्ट ग्रुप 1 डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

या शिवाय नऊ रेल्वे स्टेशनवर आठवडाभर तपासणी आणि जनगागृती करण्यात येणार आहे. शिवाय विधवा एड्सग्रस्त महिलांची आरोग्य तपासणी (health check up) हेल्थ ठेवण्यात आली आहे. आणि एड्सग्रस्तांसाठी आनंदमेळावा ठेवण्यात येणार आहे.

“सपोर्ट ग्रुप एआरटी केंद्रात सुरु करण्यात येणार आहे. मुंबईत २० एआरटी केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये केअर टेकर, केंद्रांमधील रुग्णसंख्येला अनुसरुन १ ते ३ समुपदेशक असतात. वॉलिटियंर देखील आहेत. यावेळी आहार, योजना आणि सपोर्टग्रुप बद्दल सांगण्यात येतील.”

  • डॉ. श्रीकला आचार्य,
    संचालिका, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here