@maharashtracity

९२ लाख नागरिकांना पहिला डोस

मुंबई: मुंबई महापालिकेने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या (vaccination drive) अंतर्गत १६ जानेवारी ते १३ नोव्हेंबर या १० महिन्यांच्या कालावधीत ९२ लाख ३६ हजार ५०० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचे टार्गेट पूर्ण केले आहे. आता लसीचा दुसरा डोस देण्याचे टार्गेट पूर्ण करण्याची प्रतीक्षा आहे.

यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे.

मुंबईत लसीचा पहिला व दुसरा डोस मिळून एकूण दीड कोटी डोस देण्याची कामगिरी १० नोव्हेंबर २०२१ रोजी साध्य करण्यात आली. प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. १३ नोव्हेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर झाली आहे. त्यामुळे आज पहिल्या डोसचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाले आहे.

दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ५९ लाख ८३ हजार ४५२ मुंबईकर नागरिकांनी दुसरा डोस देखील घेतल्याची नोंद झाली आहे. पहिल्या डोसचे टार्गेट पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या डोसचे टार्गेट देखील लवकरात लवकर गाठण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

लसीचा दुसरा डोस देय असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here